सातारावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, शिवसागर जलाशय, मिनी काश्मिर-तापोळा, ठोसेघर धबधबा, भांडवली धबधबा, संगम माहूली अशी अनेक आकर्षणे पर्यटकांना सातारामध्ये आकर्षित करतात. पर्यटनाबरोबर इतर काही बाबतीत सातारचे नाव देशभर प्रसिद्ध आहे, त्यातील काहींचा अगदी थोडक्यात आढावा. थोडक्यातच कारण की या ठिकाणी जाउनच निसर्गाचा खरा अनुभव घेणेच उपयुक्त होईल.

सातारचे कंदी पेढे

सातारहून काय आणलयं या प्रश्नाचे उत्तर सातारला भेट देणार देतो - सातारचे कंदी पेढे, सातारचे कंदी पेढे हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

 

साताराची भावे सुपारी बडीशेप

जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी तसेच पाचक म्हणून सातारच्या भावे यांची बडीशेप उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बडीशेप इतर ठिकाणी असतीलच पण भावे बडीशेपची चव काही औरच आहे.

 
सातारचे राउत यांची स्वादीष्ट जिलेबी
सातारामध्ये राउत बंधू यांची जिलेबी विशेष प्रसिध्द आहे. सर्वसामान्यांना परवडणा-या दरामध्ये स्वादिष्ट्य जिलेबी राउत यांच्याकडे मिळते.
 
कास पठाराबाबत कितीही उल्लेख कमीच आहे. आपण www.kas.ind.in या वेबसाइटला भेट देवू शकता. कास पठाराचा समावेश वल्ड हेरीटेजमध्ये करण्यात आला आहे ही सातारच्या दृष्टीने गौरोवाची बाब आहे.
 

कास तलाव

सातारा शहाराची तहान भागवणारा कास तलाव हा नैसर्गिकदृष्ट्या नटलेला आहे. बारा महिने पर्यटकांची वर्दळ येथे असते.

 

ठोसेघर धबधबा

ठोसेघर धबधबा बारा महि्ने पर्यटकांचे महत्त्वाचा आकर्षण ठरतो.

 

भांबवली-वजराई धबधबा

महाराष्ट्रातील सर्वात उंच, हिरव्या गर्द झाडीत लपलेला, बारमाही वाहणारा, विलोभनिय आणि भव्य दिव्य भांबवली-वजराई धबधबा (कास पुष्प पठार 5 किमी अंतरावर)

 

दक्षिण काशी तिर्थ संगम माहूली

कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम माहूली या गावी झाला आहे. याच संगमाच्या काठावर श्री काशी विश्वेश्वराचे मंदीर आहे. हा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आलेला आहे. हा परिसर मराठी-हिंदी चित्रपट निर्मात्यांना देखील आवडीचा झाला आहे. या ठिकाणी अनेक गाजलेल्या मराठी-हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. तसेच या ठिकाणी वैकुंठगमनासाठी बालाजी ट्रस्टतर्फे असणारी कैलास स्मशान भूमी आहे.

 
वरील भागावर जाण्यासाठी मला टिचकी द्या ---