----- अजिंक्यातारा सातारा येथे झालेल्या घनघोर युद्धाचे ना. स. इनामदार यांनी `शहेनशहा`या कादंबरीत केलेले वर्णन वाचकाला खिळवून ठेवते. तसेच पेशवे पदाची सुत्रे सातारच्या गादीने दिली होती. असे इतिहासावरुन ज्ञात होते. तेव्हा सातारची छाती स्फुरण पावते. साता-यातील रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857 स्वातंत्र युद्धात भाग घेतला होता. त्यानंतर स्वातंत्र्य चऴवळीत सातारा जिल्ह्याने उडी घेतली होती. सातारा शहर तसेच परिसराला मोठा इतिहास आहे. सातारा जिल्ह्यातील कित्येक थोर योद्धे, राजे, संत, थोर व्यक्तिमत्वांनी महाराष्ट्राचा इतिहास घडविला आहे. सातारचे देश पातळीवर नेले आहे. सातारा जिल्ह्यातील अशी व्यक्तिमत्वे, धामिँक, पर्यटन स्थळे, औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, तंत्रज्ञान आदी सर्वच बाबतीत सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या बाबतीत सातारा प्लस आहे. सातारा प्लस केवळ इतिहासच नव्हेतर वर्तमान, भविष्यकाळातही प्लस राहणार आहे, उजवा राहणार आहे.