साताराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. सातारची भूमी शिवरायांच्या तसेच स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. स्वातंत्रपूर्व काळात सातारामध्ये अनेक क्रांतीकारक होउन गेले. त्यांची स्मृती आजही साता-यात आहे. सातारा युवकांना प्रेरणा देणारा आहे. अशाच काही प्रेरणादायक वास्तूंची ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. |
अजिंक्यतारा हा किल्ला सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यतील आहे. सातारा शहराच्या अगदी जवळ आहे. प्रतापगडापासून फुटणार्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. अजिंक्यतार्याची उंची साधारणत: ३०० मीटर असून ती दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटरआहे.सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्यतारा केले., पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. पुढे पेशव्यांकडे हा किल्ला गेला. दुसर्या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. भारतामध्ये अनेक गड-किल्ले आहेत पण तारा (स्टार) आणि अजिंक्य (अनडिफेटेबल) नाव असणारा एकच अजिंक्यातारा आहे. साताराच्या कोणत्याही भागातून अजिंक्याताराचे दर्शन होते.
|
चार भिंती |
हुतात्मा स्मारक-फाशीचा वड |
||
|
|
तोफेच्या तोंडी दिले |
सातारामध्ये सन 1946 रोजी जवाहर बाग स्थापन झाली. या बागेमध्ये स्वातंत्र्य युद्धात बलिदान केलेल्या असंख्य हुतात्म्यांची स्मृति म्हणून राष्ट्र ध्वज स्तंभ ता. 15 ऑगस्ट 1947 रोजी उभारण्यात आला. त्याची देणगी सातारा इलेक्ट्रीकल यांनी दिली होती. 15 ऑगस्ट तसेच 26 जानेवारी रोजी या ठिकाणी झेंडा वंदन केले जाते. या बागेला गोल बाग म्हणूनही ओळखले जाते. या बागेमध्ये श्री. छ. प्रतापसिंह महाराज यांचा पुतळा आहे. तसेच या पुतळ्याच्या चौथ-यावर अनेक क्रांतीविरांचा उल्लेख आहे. |
छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने सज्जनगड पावन झाला आहे. अजिंक्याताराच्या पश्चिम बाजूस हा गड आहे. याच गडावर समर्थ रामदास स्वामी यांनी माघ वद्य नवमी शके १६०३ - सन १६८१ - रोजी रामदासस्वामींनी सज्जनगडावर देह ठेवला.हा गड उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे. गडाच्या पायथ्याशी समर्थ दर्शन हा एक समर्थ रामदास यांच्या जीवनावरील थीम पार्क नुकताच उभारण्यात आला आहे. यामध्ये समर्थांच्या कार्याची ओळख होते. |
वरील भागावर जाण्यासाठी मला टिचकी द्या --- |